Pradhanmantri Ujwala Gas Yojana

Pradhanmantri Ujwala Gas Yojana देशभरातील सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी शासन नवनवीन योजनांची अंमलबजावणी करीत असते. केंद्र शासनाच्या अंतर्गत महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या उज्वला गॅस योजनेची माहिती आपण या ब्लॉगमध्ये सविस्तर पाहणार आहोत.

उज्वला गॅस योजना 2024 संदर्भातील माहिती, आवश्यक कागदपत्रे, नियम व अटी आणि अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया खाली देण्यात आलेली आहे.

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना सविस्तर माहिती

 

ग्रामीण भागातील कुटुंबांच्या राहणीमानात बदल व्हावा या उद्देशाने शासना अंतर्गत आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांसाठी उज्वला गॅस योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे.

या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात येते. वर्षभरात 03 सिलेंडर मोफत आणि त्यासोबत अनुदान देखील मिळणार आहे.

देशभरातील महिलांना चुलीपासून दूर करून एलपीजी च्या वापरासाठी प्रोत्साहन करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

नियम व अटी  – 

  • कुटुंबातील एकच महिला सदस्यांना (18 वर्षा पुढील) लाभ मिळतो.
  • लाभार्थ्याच्या नावावर जुने गॅस कनेक्शन नसावे.
  • अर्जदार महिला सदस्याचे नाव बीपीएल कुटुंबात आवश्यक.

आवश्यक कागदपत्र – 

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • कुटुंबाचे रेशन कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • अर्जदार महिलेचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • विज बिल/पाणी बिल/घरपट्टी यापैकी एक प्रमाणपत्र
  • कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड झेरॉक्स
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • मोबाईल नंबर

 

अर्ज करण्याची प्रक्रिया 

पात्र व इच्छुक महिला अर्जदार या योजनेच्या लाभ घेण्यासाठी ऑफलाइन व ऑनलाइन या दोन्ही पद्धतीने अर्थ सादर करू शकता.

या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

तसेच आपल्या जवळील ऑनलाइन सीएससी सेंटर मध्ये जाऊन देखील अर्ज भरू शकतात.

सविस्तर माहिती पहा 👇

 

 

नवनवीन माहिती साठी WhatsApp Group जॉइन करा 

क्लिक करा 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version