Vihir Anudan Yojana 2024-25 नमस्कार शेतकरी बांधवांनो. महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नवनवीन योजनांची अंमलबजावणी करत असते. महाराष्ट्र राज्य भरातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना स्वतःच्या विहिरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.
या संदर्भातील आवश्यक पात्रता, कागदपत्र आणि अर्ज करण्याची प्रक्रिया या संदर्भातील सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Vihir Anudan Yojana 2024-25
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने या महत्त्वपूर्ण योजना महाराष्ट्र सरकार अंतर्गत राबवली जात आहे. अनेक शेतकरी आजही कोरडवाहू शेतीवर अवलंबून आहेत. मात्र ही समस्या दूर करण्या च्या हेतूने व शेतकऱ्यांचे व राहणीमान उच्च व्हावे यासाठी. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहिरीच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली असून पात्र लाभयार्थना या अंतर्गत पाच लाखांपर्यंतचे अनुदान देण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या अंतर्गत पंचायत समिती कृषी विभाग योजना तून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. राज्यभरातील आर्थिक दुर्बल लाभार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून अनुदान मिळणार आहे. ही एक महत्त्वपूर्ण योजना असून राज्यभरातील तरुण शेतकरी या कृषी क्षेत्राकडे आकर्षित व्हावे हा या योजनेचा उद्देश दिसून येतो.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना
विहीर अनुदान योजना पात्रता –
- अनुसूचित जाती व जमाती मधील शेतकरी.
- अल्पभूधारक शेतकरी
- भटक्या व विमुक्त जाती प्रवर्गातील शेतकरी
- दारिद्र्य रेषेखालील शेतकरी
विहीर अनुदान योजना लागणारी कागदपत्र –
1.आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो.
2. कुटुंबाचे रेशन कार्ड
3. मोबाईल नंबर
4. रहिवाशी दाखला
5. ई-मेल आयडी
6. रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड
7. उत्पन्नाचा दाखला
8. बँक खात्याचा तपशील
9. सातबारा उतारा 7/12 व 8 अ उतारा
अनुदानासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
पात्र व इच्छुक शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. याची सविस्तर माहिती खाली वाचा.
ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया –
अर्जदाराने अर्ज करण्यासाठी आवश्यक संपूर्ण अर्ज भरून, कागदपत्रांसह माहिती आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावे. ग्रामपंचायत पुढील अर्ज भरण्याची प्रक्रिया करण्यात येईल.
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया –
- प्रथम महाराष्ट्र शासनाच्या या MahaDBT अधिकृत पोर्टलवर जा.
- यानंतर दिलेल्या अर्जातील संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरून अर्ज सबमिट करा.
- अर्जदार आपल्या जवळील ऑनलाईन सीएससी सेंटर मध्ये जाऊनही ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.
- अधिकृत वेबसाइट – क्लिक करा
नवनवीन योजनांच्या माहिती साठी योजना ग्रुप जॉइन करा 👇