Sugar Harvester Machine Scheme महाराष्ट्र राज्यात मागील हंगामातील ऊस लागवडी खालील क्षेत्र 14.88 लाख हे. इतके असून 1321 लाख मेट्रिक टन इतके ऊसाचे गाळप झाले आहे. राज्यात ऊस तोडणीआणि वाहतुकीचे काम हे ऊसतोडणी मजूरांमार्गत केले जाते. शासनाने ग्रामीण क्षेत्रात विविध प्रकारच्या शैक्षणिक सोयीसुविधा तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे ग्रामीण भागातील मजूरांचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक स्तर उंचािला आहे. त्यामुळे मागच्या काही हंगामात राज्यातील ऊसतोडणी मजूरांची संख्या कमी होत असल्यामुळे ऊस तोडणीची समस्या निर्माण झाली आहे. या वर उपाय म्हणून शासना अंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे.
या योजने संदर्भातील अधिक माहिती, अर्जासाठी लागणारी कागदपत्र, अर्ज करण्याची प्रक्रिया या संदर्भातील सविस्तर माहिती खाली वाचा.
Sugar Harvester Machine Scheme
या योजनेमध्ये सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना प्रत्येकी जास्तीत जास्त 3 ऊसतोडणी यंत्रासाठी अनुदान देय राहणार आहे.
पात्र लाभार्थी यांनी यंत्र किमतीच्या किमान 20% रक्कम स्व भांडवल म्हणून गुंतवणूक करावी लागणार आहे. बाकीची रक्कम ही कजगरूपाने उभे करण्याची जबाबदारी पात्र लाभार्थ्याची आहे.
ड्रोन अनुदान योजनेची डीबीटी पोर्टल वर अर्ज प्रक्रिया सुरू.
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना सविस्तर माहिती
या योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणजेच ऊस तोडणी यंत्राच्या अनुदानासाठी अर्जदारांनी शासनाच्या अंतर्गत देण्यात आलेल्या कृषी विभागाच्या अधिकृत महाडीबीटी या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या आधी अनुदानचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा पुन्हा लाभ मिळणार नाही. तसेच तुम्हाला तुमच्या यंत्राचा वापर फक्त महाराष्ट्रातच करावा लागणार आहे. आम्हाला अंतर्गत मिळालेल्या ऊस तोडणी यंत्राची किमान सहा वर्ष विक्री संबंधित मालकाला करता येणार नाही.
वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, खाजगी व सहकारी कारखाने, शेतकरी उत्पादक संस्था यांना ऊस तोडणी यंत्राच्या कशासाठी 40% म्हणजेच 35 लाखांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. Sugar Harvester Machine Scheme
आवश्यक कागदपत्र –
- अर्जदाराचे आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी प्रमाणपत्र
- कुटुंबाचे रेशन कार्ड
- बँक पासबूक
- 7/12 व 8 उतारा
- ऊस तोडणी यंत्राचे कोटेशन
- प्रतिज्ञापत्र
- अर्ज दराचा चालू मोबाईल नंबर
ऊस तोडणी यंत्र अनुदान अर्ज करण्याची प्रक्रिया
या यंत्राच्या अनुदानासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. तुम्ही तुमच्या मोबाइल वरुन देखील अर्ज दाखल करू शकता.
- अर्ज सादर करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईल मध्ये. mahadbt या अधिकृत पोर्टलवर जा.
- उजव्या बाजूला असलेल्या शेतकरी योजना हा पर्याय निवडा.
- आधार क्रमांकाचा किंवा वापरकर्ता आयडी चा उपयोग करून लॉगिन करा. (नवीन असल्यास नवीन अर्जदार नोंदणी हा पर्याय निवडा)
- नंतर मुखपृष्ठ हा पर्याय निवडून अर्ज करा या पर्यायाला क्लिक करा.
- कृषी यांत्रिकीकरण या समोरील बाबी निवडा या पर्यायाला क्लिक करा.
- नवीन पेज ओपन झाल्यानंतर मुख्य घटक यामध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा.
- तपशील या मध्ये – मनुष्यचलित अवजारे हा पर्याय निवडा.
- यंत्रसामग्री, अवजारे/उपकरणे या पर्यायांमध्ये – ऊस तोडणी यंत्र हा पर्याय निवडा.
- मशीनचा प्रकार – ऊस तोडणी यंत्र
- खाली दिलेल्या बॉक्सला टिक करा .☑ आणि जतन करा पर्यायाला क्लिक करा.
- नंतर NO हा पर्याय निवडा.
- नवीन पेज ओपन झाल्यानंतर अर्ज करा हा पर्याय निवडून OK करा.
- पहा हा पर्याय निवडा
- तुम्ही भरलेल्या बाबीची माहिती तुम्हाला दिसेल. अटी व शर्ती मान्य करून अर्ज सादर करा हा पर्याय निवडा.
- यानंतर अर्ज शुल्क भरून पुढे जा. (23.60 /- रुपये )
- नवीन पेज उघडल्यानंतर डाव्या बाजूला असलेल्या मी केलेला अर्ज हा पर्याय निवडा. यामध्ये तुम्ही सादर केलेला तुमचा अर्ज तुम्हाला दिसेल.
योजनेची अधिक माहिती साठी | इथे क्लिक करा |
ऊस तोडणी यंत्र अनुदान GR साठी | इथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
नवीन योजनांच्या माहिती साठी WhatsApp ग्रुप जॉइन करा
इथे क्लिक करा
बियाणे टोकन यंत्र खरेदीसाठी मिळणार अनुदान. लगेच करा अर्ज