Soyabean Kapus Anudan नमस्कार शेतकरी बांधवांनो. राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही बातमी आनंदाची असणार आहे, याचे कारण म्हणजे सोयाबीन व कापूस अनुदान चे वितरण लवकरच म्हणजे 26 सप्टेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घोषणा केली. या अनुदानासाठी शेतकऱ्यांना मोठी प्रतीक्षा करावी लागली आहे. हेक्टरी 5 हजार रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 26 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असल्याने होणाऱ्या कार्यक्रमांतर्गत अनुदान वाटपाचा शुभारंभ केल्या जाण्याची शक्यता आहे.
सोयाबीन-कापूस अनुदान वाटप तारीख
राज्याच्या कृषी विभागाच्या बैठकीत या अनुदान वाटपाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सोयाबीन व कापूस अनुदान वितरणाच्या विषयाबाबत 19 सप्टेंबर रोजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत एक विशिष्ट बैठक घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्या म्हणजेच ई- केवायसी व मोबाईल आधार लिंकिंग च्या कामाला गती देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांना वेळेत अनुदान मिळावे म्हणून 26 सप्टेंबर च्या आत हे काम पूर्ण करण्याबाबतची सूचना देण्यात आली आहे. यानंतर अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल असे आश्वासन मंत्री मुंडे यांनी बोलताना व्यक्त केली.
46 लाख शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात मिळणार लाभ
2023 या वर्षातील खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक 46 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. या अनुदान वाटपासाठी राज्य सरकारने 4194 कोटी रुपये यांच्या निधीला मान्यता देण्यात आलेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची केवायसी आणि आधार लिंकिंग झाल्यानंतरच त्यांना त्यांचे अनुदान मिळणार आहे.
दहा लाख शेतकऱ्याची ई -केवायसी नाही
अनुदान जमा होण्याची तारीख जवळ आली असली तरी पण महाराष्ट्रातील जवळपास दहा लाख शेतकऱ्यांची अद्याप पडताळणी अपूर्ण आहे. ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी अपूर्ण आहे त्यांना अनुदान उशिरा मिळवू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करून अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा करायचा आहे. Soyabean Kapus Anudan
नवनवीन योजनांच्या माहीती साठी या लिंक ला क्लीक 👇 करू whatsApp ग्रुप जॉइन करा
इतर चालू योजना माहिती
लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार, पहा सविस्तर माहिती
मागेल त्याला सोलर कृषीपंप अर्जप्रक्रिया सुरु, अधिक माहिती पहा