PM Kisan Yojana Nondani, नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना (पी एम किसान) नोंदणीत आता शासनांतर्गत बदल करण्यात आला आहे. याबाबतचे प्रसिद्ध पत्र ही शासनाने प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये कोणकोणती नवीन महत्त्वाची माहिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
PM Kisan Yojana Nondani
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना प्रति वर्षाच्या 06 हजार रुपये याप्रमाणे निधी मिळतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक असते. ज्या शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण आहे अशा शेतकऱ्यांना या निधीचा लाभ घेता येतो. आता याच नोंदणीच्या कार्यपद्धतीत बदल करण्यात आले आहे, ही सविस्तर माहिती खाली वाचा.
नोंदनीत करण्यात आलेले मोठे बदल
नवीन बदल करण्यात आलेल्या नोंदणी बाबतीत सरकार अंतर्गत एक प्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये आवश्यक कागदपत्रे, करण्यात आलेली बदल याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज प्रक्रियेला सुरुवात, लाभार्थ्यांना मिळणार 05 लाखांपर्यंत पर्यंत लाभ
नवीन नोंदणी करण्यासाठी अर्जाची प्रक्रिया
खालील सर्व ऑनलाईन अपलोड केलेली कागदपत्रे पडताळणी नंतर लाभार्थ्यांना मान्यता देण्यात येईल.
- मागील तीन महिन्यातील डिजिटल/तलाठी सहीचा 7/12 उतारा.
- जमीन नोंदणीचा फेरफार (लाभार्थींच्या नावे जमीन धारणा 01/02/2019 पूर्वीची असणे आवश्यक आहे.)
- वारसा नोंद फेरफार दिनांक 01/02/2019 नंतरची असल्यास ज्यांच्या नावावरून वासाने जमीन आले आहे त्यांच्या नावे जमीन आलेला फेरफार सोबत जोडणे आवश्यक आहे.
- पती, पत्नी व 18 वर्षाखालील आपत्यांची आधार कार्ड जोडणे देखील आवश्यक आहे.
जे लाभार्थी अपात्र ठरले आहेत त्यांच्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे –
- अपात्रता मागे घेण्याचा विहित नमुन्यातील अर्ज द्यावा लागणार आह
- लाभार्थ्याची पोर्टल वरील स्टेटस ची प्रिंट.
- लाभार्थ्याच्या कुटुंबातील आधार कार्ड (पती-पत्नी,18 वर्षाखालील अपत्य)
- कृषी सहाय्यक यांचे प्रमाणित केलेले परिशिष्ट
- नवीन डिजिटल/तलाठी सहीचा ७/१२ व ८ अ
- जमीन नोंदणीचा फेरफार/आता नोंदीचा फेरफार
अपात्र लाभार्थ्यांनी अपात्रता मागे घेण्याची कागदपत्रे याच्या दोन प्रतीत करून तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करावे लागणार आहे.
नवनवीन शेतकरी उपयोगी माहिती साठी WhatsApp ग्रुप जॉइन करा