Kapus Soyabean Anudan KYC, नमस्कार शेतकरी बांधवांना, राज्य शासना अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली म्हणून सोयाबीन व कापूस या पीक उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदान संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यात अनुदान बाबतचे अपडेट देण्यात आले आहे.
या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी जीआर मध्ये दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना KYC करणे अत्यंत आवश्यक आहे. KYC न केलेल्या शेतकऱ्यांना अपात्र होऊन त्यांना या अनुदानाचा लाभ घेता येणार नाही. KYC ची संपूर्ण सविस्तर प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे यांची माहिती खाली पहा.
कापूस सोयाबीन अनुदान KYC
2023 या वर्षातील खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. यांना प्रति हेक्टर साठी 5 हजार रुपये या प्रमाणे पात्र शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. 02 हेक्टर पर्यंत या अनुदानाची मर्यादा असणार आहे.
कृषी विभागा अंतर्गत दिनांक 26 सप्टेंबर या रोजी शेतकऱ्यांनी कृषीकार्यालयशी संपर्क साधून केवायसी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. कृषी विभागाला मिळालेल्या आकडेवारीनुसार 21 लाख शेतकऱ्यांची e-KYC प्रक्रिया अपूर्ण होती. ज्या शेतकऱ्यांची KYC अपूर्ण असेल ते या अनुदानापासून पासून वंचित राहतील. त्यामुळे लवकरात लवकर आपापली KYC शेतकऱ्यांनी करून घ्यायची आहे. 29 सप्टेंबर पर्यंत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मागेल त्याला सोलर कृषीपंप अर्जप्रक्रिया सुरु, अधिक माहिती पहा
अनुदान ऑनलाईन KYC प्रक्रिया
या अनुदानासाठी आधार KYC करणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया तुम्ही तुमच्या मोबाईल वरून सुद्धा करता येणार आहे. किंवा शक्य नसल्यास जवळील CSC ऑनलाइन केंद्रात जाऊन देखील KYC करू शकतात.
- या प्रक्रियेसाठी तुम्हाला mahaDBT SCAGRI – Maha IT ही या अधिकृत साइट ओपन करा.
- यानंतर तुम्हाला इथे दोन पर्याय दिसेल 1.login व 2. Disbursement status. यातील दोन नंबरच्या (Disbursement status) पर्यायावर क्लिक करा.
- नंतर एक नवीन पेज ओपन होऊन तुम्हाला त्या ठिकाणी आधार क्रमांक, ओटीपी व कॅपचा कोड टाकायचा आहे.
- तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होऊन त्यामध्ये तुम्हाला तुमची सविस्तर माहिती (ई पिक पाहणी) e-KYC स्टेटस ही संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसेल.
ही ई -KYC ची प्रक्रिया तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही तुमच्या कृषी सहाय्यकाच्या मदतीने किंवा ऑनलाईन csc सेंटर मध्ये जाऊन सुद्धा करू शकता.
अधिकृत वेबसाइट – क्लीक करा
अनुदानासाठी ई – KYC कशी करायची
नवनवीन माहिती साठी WhatsApp ग्रुप जॉइन करा
ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज प्रक्रियेला सुरुवात, लाभार्थ्यांना मिळणार 05 लाखांपर्यंत पर्यंत लाभ