Drone Anudan Yojana
Drone Anudan Yojana भारतभरातील शेतकऱ्यांची कृषी क्षेत्रातील प्रगती ही सध्या पाहण्याजोगी आहे. सध्या शेतकरी आधुनिक शेतीच्या मागे वळलेला आहे. शेतकरी हा स्मार्ट वर्क करून कमी वेळात चांगले काम यंत्राच्या साह्याने करतो. नवनवीन अवजारे यांचा उपयोग करून शेतकरी चांगल्या प्रकारे स्मार्ट शेती करत आहे. सरकार अंतर्गत नवनवीन योजनांची लाभ घेऊन शेतकरी हा आधुनिक पद्धतीने शेती करून त्यांचे उत्पादन वाढवावे हा या मागचा उद्देश दिसून येतो.
केंद्र शासना अंतर्गत कृषी ड्रोन अनुदान योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. या अंतर्गत लाभार्थ्यांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती अर्जप्रक्रिया, आवश्यक कागदपत्र, पात्रता व अर्जप्रक्रिया याची माहिती खाली दिली आहे.
बियाणे टोकन यंत्र खरेदीसाठी मिळणार अनुदान. लगेच करा अर्ज
ड्रोन अनुदान योजनेची सविस्तर माहिती
कृषी ड्रोन अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती उपयोगी साठी म्हणजेच फवारणीसाठी ड्रोन दिले जाणार आहे. याचा वापर करून शेतकरी अत्याधुनिक पद्धतीने शेती करू शकतो. कृषी ड्रोन खरेदी करण्यासाठी शासनांतर्गत पाच लाखांपर्यंतची आर्थिक मदत व अनुदान या योजनेच्या अंतर्गत दिले जाणार आहे. या योजनेच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला महाडीबीटी या पोर्टलवर सुरुवात झालेली आहे.
विद्यापीठ व सरकारी संस्था यांना 100% अनुदान मिळणार आहे. (दहा लाखांपर्यंतचे). आणि शेतकरी उत्पादक संस्था यांना 75% अनुदान. तर शेतकरी उत्पादक संस्थांनी दोन भाड्याने घेतल्यास प्रति हेक्टर सहा हजार रुपये याप्रमाणे अनुदान या अंतर्गत दिले जाणार आहे. य
या कृषी ड्रोन चा वापर करून युवा शेतकरी भाडेतत्त्वावर याचा व्यवसाय देखील करू शकणार आहेत. यातून मिळालेल्या ड्रोनच्या मदतीने युवकांना रोजगार देखील प्राप्त होणार आहे . तसेच ड्रोनच्या साह्याने वेळेची देखील बचत होणार आहे. कृषी क्षेत्रातील शेतीचे काम या ड्रोनच्या साह्याने कमी वेळेत पूर्ण करण्या मागचा या योजनेचा उद्देश आहे. Drone Anudan Yojana
पात्रता –
- अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी पाहिजे.
- कृषी विज्ञान केंद्र, शेतकरी उत्पादन संस्था, कृषी विद्यापीठ, भारतीय कृषी संशोधन परिषद संस्था, कृषी यंत्र व अवजारे तपासणी संस्था इत्यादी योजनेसाठी पात्र असणार आहेत.
आवश्यक कागदपत्र
- अर्जदाराचे आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो
- महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र
- राष्ट्रीय बँकेतील खाते पासबुक
- रेशन कार्ड
- संस्थेची नोंदणीकृत प्रमाणपत्र
- कृषी पदवी
- स्वयंम घोषणापत्र
- पूर्व संमती पत्र
- ड्रोनची कोटेशन बिल
ड्रोन अनुदान योजने साठी अर्ज करण्याची प्रक्रिया
- पात्र व इच्छुक उमेदवार ड्रोन अनुदान योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकतात.
- आपल्या जवळील ऑनलाइन CSC केंद्रात जाऊन तुम्ही तुमचे अर्ज लवकरात लवकर भरून घ्यायची आहेत.
लॉटरी पद्धतीने अर्जदारांना या अंतर्गत पात्र ठरविण्यात येणार आहे.
अधिकृत वेबसाइट – mahadbt.maharashtra.gov.in
नवनवीन योजनेच्या माहितीसाठी WhatsApp ग्रुप जॉइन करा
अर्ज करण्याची सविस्तर माहिती इथे पहा
मागेल त्याला शेततळे योजना. अर्जप्रक्रिया, लागणारी कागदपत्र,सविस्तर माहिती इथे पहा