Biyane Tokan Yantra Subsidy | बियाणे टोकन यंत्र खरेदीसाठी मिळणार अनुदान. लगेच करा अर्ज ..

Biyane Tokan Yantra Subsidy

Biyane Tokan Yantra Subsidy नमस्कार शेतकरी बांधवांनो. आजची बातमी ही शेतकऱ्यांसाठी खास असणार आहे. Maha DBT पोर्टल द्वारे शेतकऱ्यांना विविध कृषी अवजारे खरेदी साठी अनुदान दिले जाते. विविध प्रकारच्या बियाणे लागवडीकरीता उपयोगी येणाऱ्या बियाणे टोकन यंत्रावर देखील या अंतर्गत अनुदान दिले जाणार आहे.

या संदर्भातील पात्रता, सविस्तर माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया या बाबतची अधिक माहिती खाली दिली आहे.

बियाणे टोकन यंत्र सबसीडी बाबत अधिक माहिती 

महाराष्ट्र राज्य भरातीलतील शेतकरी या टोकन यंत्रासाठी आपापले अर्ज हे दाखल करू शकतात. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्जदारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत. आज-काल बहुतेक शेतकरी हे आधुनिक पद्धतीने शेती करीत असल्यामुळे टोकन पद्धतीने पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. या टोकन यंत्राच्या साह्याने शेतीस भरपूर मोठा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे.

याद्वारे पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना तोपर्यंत खरेदीसाठी 50% अनुदान दिले जाणार आहे. या यंत्राच्या साह्याने शेतकरी आपले काम सहज व कमी कालावधीत पुन्हा करू शकतात.

ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर लॉटरी पद्धतीने निवड झाल्यास टोकन यंत्र खरेदी करिता पूर्व संमती मिळते. त्यानंतर त्यानंतर खरेदीची कागदपत्रे सादर केल्यानंतर डीबीटी प्रणालीद्वारे अनुदान डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केल्या जाते.

अर्ज करण्याची प्रक्रिया 

इच्छुक असलेले शेतकरी आपण यंत्राच्या अनुदानासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. तुम्ही तुमच्या मोबाइल वरुन देखील अर्ज दाखल करू शकता. 

  • अर्ज सादर करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईल मध्ये. mahadbt या अधिकृत पोर्टलवर जा.
  • उजव्या बाजूला असलेल्या शेतकरी योजना हा पर्याय निवडा.
  • आधार क्रमांकाचा किंवा वापरकर्ता आयडी चा उपयोग करून लॉगिन करा. (नवीन असल्यास नवीन अर्जदार नोंदणी हा पर्याय निवडा)
  • नंतर मुखपृष्ठ हा पर्याय निवडून अर्ज करा या पर्यायाला क्लिक करा.
  • कृषी यांत्रिकीकरण या समोरील बाबी निवडा या पर्यायाला क्लिक करा.
  • नवीन पेज ओपन झाल्यानंतर मुख्य घटक यामध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा.
  • तपशील या मध्ये – मनुष्यचलित अवजारे हा पर्याय निवडा.
  • यंत्रसामग्री, अवजारे/उपकरणे या पर्यायांमध्ये – टोकन यंत्र हा पर्याय निवडा.
  • मशीनचा प्रकार – टोकन यंत्र
  • खाली दिलेल्या बॉक्सला टिक करा .☑ आणि जतन करा पर्यायाला क्लिक करा.  Biyane Tokan Yantra Subsidy 

Biyane Yokan Yantra Subsidy

  • नंतर NO हा पर्याय निवडा.
  • नवीन पेज ओपन झाल्यानंतर अर्ज करा हा पर्याय निवडून OK करा.
  • पहा हा पर्याय निवडा
  • तुम्ही भरलेल्या बाबीची माहिती तुम्हाला दिसेल. अटी व शर्ती मान्य करून अर्ज सादर करा हा पर्याय निवडा.
  • यानंतर अर्ज शुल्क भरून पुढे जा. (23.60 /- रुपये )
  • नवीन पेज उघडल्यानंतर डाव्या बाजूला असलेल्या मी केलेला अर्ज हा पर्याय निवडा. यामध्ये तुम्ही सादर केलेला तुमचा अर्ज तुम्हाला दिसेल. (यामध्ये तुमचे पेमेंट कधीकधी थोड्या वेळेसाठी pending दाखवले जाईल). Biyane Tokan Yantra Subsidy 

नवीन योजनांच्या माहिती साठी WhatsApp Group जॉइन करा 

क्लिक करा 

अधिक माहिती इथे पहा 👇

 

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, असा करा अर्ज…
शेतकऱ्यांना विहिरी साठी मिळणार 05 लाखांपर्यंतचे अनुदान, असा करा अर्ज

Leave a Comment